अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 49 वर्षाचे होते.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.
सन 1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आले होते.

मंदिराने दिला पतीच्या पार्थिवाला खांदा
पतीच्या अचानक झालेल्या निधनाने मंदिरा पूर्ण कोसळली आहे. तरी देखील आपल्या पतीच्या पार्थिवाला तिने खांदा दिला. यावेळी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. हसत्या खेळत्या कुटुंबावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळला त्यामुळे सगळेच हळहळ व्यक्त करीत आहेत. राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच फादर्स डे निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते. तर, राज कौशल यांनी रविवारी मित्रांसोबत पार्टीही केली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपला वीकेंड अत्यंत शानदार गेल्याचंही म्हटलं होतं.

Leave a Reply

%d bloggers like this: