Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

भारतीयांना लवकरच मॉडर्ना लस मिळणार

नवी दिल्ली : सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक ही लस दिली जात आहे. पण आता देशातील नागरिकांना आणखीन एक लसीचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच भारतामध्ये चौथ्या लसीचा डोस उपलब्ध होणार आहे. आज डीसीजीआय ने मॉडर्नाच्या कोरोना लसीच्या आयातीला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच सरकारकडून आपात्कालीन वापरासाठी देखील मंजूरी मिळू शकते, 

सिप्लाने मॉडर्ना लसीच्या आयात आणि मार्केट अथॉरायजेशनसाठी मंजूरीची मागणी केली होती. त्यानंतर डीसीजीआयने ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट १९४० अंतर्गत नवीन औषधं आणि क्लिनिकल परीक्षण नियम २०१९ च्या तरतुदीनुसार, सिप्लाला देशात आपात्कालीन वापराला मॉडर्ना कोरोना लस आयत करण्याची परवानगी दिली आहे.

DCGIने १ जूनला परदेशी लसींच्या नियम शिथल केले होते. DCGIने सांगितले होते की, जर कोणत्या लसीला अमेरिका, युरोप, यूके, जपान किंवा डब्ल्यूएचओकडून मंजूरी मिळाली आहे, तर भारतामध्ये ब्रीजिंग ट्रायल करण्याची गरज नाही.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मॉडर्नाच्या लसीला मंजूरी मिळाली आहे. WHOनुसार, मॉडर्नाची लस कोरोनावर ९४.१ टक्के असरदार आहे. मॉडर्नाचा पहिला डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी कोरोना होण्याचा धोका ९४.१ टक्के कमी होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading