Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अनिल देशमुख यांच्या वकिलांनी मागितली पुढची तारीख

मुंबई :मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती. आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजेपर्यंत ईडीने त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु आता अनिल देशमुखांनीच ईडीला पत्र लिहिले आहे. यात व्हीसीद्वारे जबाब घेण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच ईडीने कागदपत्रे दिल्यास आजच ईडीसमोर उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

दरम्यान, अनिल देशमुख हे आजही ईडीसमोर चौकशीसाठी गेलेले नाहीत. प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची त्यांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ, व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब नोंदवावा, असे म्हटले आहे. त्यामुळे चौकशीसाठी आल्यावर देशमुखांना अटक तर होणार नाही ना? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

तसेच ईडीला लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, मी जवळपास 72 वर्षांचा आहे, उच्च रक्तदाब, हृदयासंदर्भातील समस्या आणि विविध प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त आहे. तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. म्हणूनच आज स्वत: उपस्थित राहणे योग्य नाही आणि मी माझा अधिकृत प्रतिनिधी पाठवत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading