कोरोना – रत्नागिरीच्या तीन बालकांची डेल्टा प्लस व्हेरियंटवर मात

रत्नागिरी : जिल्ह्याला बसलेला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा विळखा दिवसेंदिवस जास्त घट्ट होतोय. आता कोरोनाच्या या नव्या अवताराने चिमुकल्यांना आपल्या कचाट्यात घ्यायला सुरुवात केली आहे. रत्नागिरीत तीन मुलांना डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झाली होती अशी माहिती समोर येत आहे. दिलास्याची बाब ही आहे की, या तीनही मुलांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे जितके रुग्ण आढळले होते त्यात सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ रुग्णांचा समावेश होता. त्यामध्ये तीन बालकांचा समावेश होता. समाधानाची बाब अशी की, ही तीन बालके तीन ते सहा वयोगटातील असून त्यांनी डेल्टा प्लसवर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: