कुठलीही कला ईश्वराची सेवा म्हणुन जोपासा – शोभा धारिवाल 

पुणे: डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या नृत्य सम्राट  पं. बिरजू महाराज या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पत्रकार भवन येथे आर. एम. डी. फाऊंडेशन च्या उपाध्यक्ष शोभा धारिवाल व जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते संपन्न झाला. 

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे डॉ. नंदकिशोर कपोते  यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शोभा धारिवाल म्हणाल्या, पंडित बिरजू महाराज पहिल्यांदा माझ्या घरी आले होते, त्यावेळी मी त्यांचे स्वागत करत धन्य झाले. या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे माझे भाग्य समजते. कुठलीही कला जोपासा,  त्याला ईश्वराची सेवा म्हणुन जोपासा. 

गुरू शमा भाटे म्हणाल्या, हे पुस्तक अत्यंत प्रभावी झाले आहे.त्यांनी पद्मविभूषण सोनल मानसिंग, पद्मभूषण पद्मा सुब्रमण्यम, पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या लेखातील काही अंश वाचून दाखविले.

पुस्तकाचे संकलन करता व प्रसिद्ध कथ्थक निर्थक डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले पं. बिरजू महाराजांवर पहिल्यांदाच असे पुस्तक लिहिले गेले आहे. यात देशातील व परदेशातील विविध क्षेत्रातील 92 कलाकारांनी यात महाराजांच्या  बद्दल लेख लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे ऐतिहासिक पुस्तक झाले आहे. या वेळी पंडित बिरजू महाराजांनी आपले शिष्य नंदकिशोर कपोते यांना पाठवलेला संदेश वाचुन दाखविण्यात आला. महाराजांनी आपल्या संदेशात म्हणाले, नंदकिशोर माझा शिष्य असून पुण्यात कथ्थक चा प्रचार व प्रशार करण्याचे कार्य करत आहे. त्याने माझ्यावर नृत्य सम्राट पंडित बिरजू महाराज हे पुस्तक काढले आहे, ते माझ्यावरच लिहिले गेले आहे. यात अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केले आहेत, यात अत्यंत दुर्मिळ फोटो आहेत, जे कोणीही पाहिले नाहीत ते सर्वांना आवडतील. मला पुस्तक खूप आवडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमीरा पाटणकर यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: