पराग मिल्क फूडस प्राइड ऑफ काऊज् ब्रॅंड फोर्टफोलिओचा विस्तार फॅट फ्री दुधासह करणार

मुंबई : पराग मिल्क फूड्स लि. ही एक आघाडीची दूध एफएमसीजी कंपनी असून गोवर्धन, गो, प्राइड ऑफ काऊज् आणि अवतार असे प्रतिष्ठित ब्रॅंड्स तिच्या नावावर आहेत. आज या कंपनीने आपल्या प्राइड ऑफ काऊज् ह्या प्रिमियम दुधाच्या ब्रॅंडअंतर्गत फॅट फ्र दुधाच्या प्रकारात प्रवेश केला आहे. कंपनीने फक्त ‘प्राइड ऑफ काऊज्’ ब्रॅंड अंतर्गत दूधाचा पुरवठा करणाऱ्या त्यांच्या भाग्यलक्ष्मी डेरी फार्मचा विस्तार करण्याची योजना आखली आहे, जिच्यामध्ये २०२६ पर्यंत १५,००० हुन जास्त गायी असतील  आणि म्हणूनच वाढीव उत्पादन होणाऱ्या दुधाला बाजार मिळवून देण्यासाठी ह्या ब्रॅंडखाली पोर्टफोलिओ विस्तारित करत आहे. प्राइड ऑफ काऊज् फॅट फ्री दूध मुंबई, पुणे, सुरत आणि दिल्लीभर २८ जून २०२१ पासून वितरित होणे चालू होईल.

उध्दाटनाच्या वेळी बोलत असताना,देवेंद्र शहा, अध्यक्ष, पराग मिल्क फूड्स लि. म्हणाले, “पराग मिल्क फूड्स प्रिमियम दूध क्षेत्रातील मागील दशकभर आघाडीवर राहिली आहे. फॅट फ्री दुधाच्या उध्दाटनासह, आम्ही प्राइड ऑफ काऊज् ब्रॅंडखाली आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत जो एक विशिष्ट वर्गाला लक्ष्य ठेवून केलेला आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्र अतिशय जलदगतीने उत्क्रांत होत आहे आणि ग्राहकसुध्दा अधिकाधिक प्रमाणात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यावर, त्यांच्या उत्पादनांचे मूळ जाणून घेण्यावर व त्यासोबतच कमी चरबी असणाऱ्या पर्यायांवर भर देत आहेत. ही वाढती गरज पाहता, आमचे प्राइड ऑफ काऊज् फॅट फ्री दूध सध्याच्या चालू सबस्क्रिप्शन मॉडेलमधून गोशाळेतून थेट आमच्या ग्राहकांना दररोज घरपोच नेऊन दिले जाईल. ग्राहकांच्या सुरक्षित, पोषक नैसर्गिक आणि प्रिमियम दुग्धोत्पादनांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी, आम्ही आमची दुग्धोत्पादनाची क्षमता २०२६ पर्यंत २,००,००० लीटर एवढी वाढवणार आहोत.”

याला दूजोरा देत, श्रीम. अक्षाली शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष – नीती, विक्री आणि विपणन, पराग मिल्क फूड्स लि. म्हणाल्या, “मूल्यवर्धित उत्पादनांचे क्रियात्मक लाभ बाजारात खूप महत्त्व प्राप्त करत आहेत. आमचे नवे फॅट फ्री दूध आमच्या प्रिमियम ब्रॅंड प्राइड ऑफ काऊज् याचे विस्तारित रुप आहे आणि पोर्टफोलिओमध्ये दही आणि एक मूल तूप ह्यानंतर प्राइड ऑफ काऊज् एक राष्ट्रीय बॅंड करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: