‘मेड ऑन रोपोसो’ या राष्ट्रीय पातळीवरील टॅलेंट हंटचे विजेते जाहीर

पुणे : भारतातील आघाडीचे शॉर्ट व्हिडीओ कंटेंट क्रीएटर्स शोधण्यासाठीच्या मजेशीर अशा स्पर्धेची सांगता करत रोपोसोने सादर केलेल्या मेड ऑन रोपोसो या राष्ट्रीय पातळीवरील टॅलेंट हंटमध्ये विजेत्यांची नावे घोषित केली गेली. अलका पेरिवाल, हर्षिता ग्रोवर, नलिनी शर्मा, नविन पांचाल, यामिनी पांडे यांसह सात जणांना विजेते म्हणून घोषीत करण्यात आले. पाच विभागांमध्ये अंतिम फेरीतील १८ स्पर्धक आणि २ वाईल्ड कार्ड एंट्रीजच्या स्पर्धकांमुळे अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. व्हर्च्युअली पार पडलेल्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागातील स्पर्धकांनी आपापल्या घरातूनच भाग घेतला. या शोचे जजेस आणि मेंटॉर्स – बॉलिवुड अभिनेत्री नेहा धुपिया, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा अंतिम फेरीसाठी उपस्थित होते.

या स्पर्धेत अलका पेरिवाल चा हेल्थ अॅण्ड फिटनेस विभागातील विजेता व्हिडीओ म्हणजे विविध भारतीय खेळाडूंना योगातून दिलेली मानवंदना होती. तर, फॅशन अॅण्ड लाईफस्टाईल विभागातील हर्षिता ग्रोवर च्या व्हिडीओमध्ये तिने पारंपरिक ते वेस्टर्न कपड्यांपर्यंतचा बदल मजेशीर पद्धतीने दाखवला होता. ऐश-अल-सराया या अरेबिक मिष्टान्नाची कृती दाखवणाऱ्या ब्रेकआऊट विभागातील व्हिडीओतून नलिनी शर्मा ने बाजी मारली. अॅक्टिंग अॅण्ड कॉमेडी विभागात शोले या ख्यातनाम सिनेमातील एका दृश्यावर विनोदी व्हिडीओ बनवून नविन पांचाल ने प्रेक्षकांची मने जिंकली. म्यझिक, सिंगिंग अॅण्ड डान्सिंग विभागात यामिनी पांडे ने तृतीय पंथीयांना स्वीकारणारा भारतातील ऐतिहासिक निर्णय आणि प्राइड मंथ आपल्या परफॉर्मन्समधून साजरा केला.

रोपोसोच्या जीएम मानसी जैन म्हणाल्या, फिक्की-ईवाय रीपोर्ट २०२१ नुसार शॉर्ट फॉरमॅट व्हिडीओ प्लॅटफॉर्म अॅप्सवरील वापरकर्त्यांमध्ये मागील दोन वर्षांत ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भविष्यात यात आणखी वाढ होईल असे आम्हाला वाटते आणि शॉर्ट व्हिडीओ व्यासपीठांवरील अगणित शक्यतांचा आम्ही वेध घेणार आहोत.

नेहा धुपिया म्हणाल्या, इतक्या प्रतिभावान कंटेंट क्रीएटर्ससाठी मेंटॉर आणि परीक्षक बनणे हा माझा सन्मान आहे.

फराह खान म्हणाल्या,  डिजिटल व्यासपीठावर उत्तम एंटरटेनर असण्यासाठी तुम्ही विशिष्ट शहरातील असणे किंवा अगदी गाणं, नृत्य, अभिनय हाच कलाप्रकार असायला हवा हे गरजेचं नाही. स्वत:ला व्यक्त करण्याच्या सर्जनशील पद्धती तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही माध्यमातून हात घालू शकता.

मुकेश छाब्रा म्हणाले, जगभरात शॉर्ट व्हिडीओ पाहण्यात प्रचंड वाढ होत असताना क्रीएटर्सना आता निव्वळ त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेच्या जोरावर घराघरात पोहोचण्याची संधी ही या स्पर्धेची खासियत आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: