उद्या दूध पुरवठा बंद ठेवण्याचे धवल क्रांती संघर्ष समितीचे दूध उत्पादकांना आवाहन
पुणे: शेतकर्यांकडून दूध खरेदी करताना गाईच्या दुधासाठी 40 रुपये प्रति लिटर व म्हशीच्या दुधासाठी 63रुपये प्रति लिटर दर जाहीर करा त्याला कायद्याने संरक्षण देण्यासाठी धवल क्रांती संघर्ष करण्याची गरज आहे उद्या रविवार तारीख 27 जून रोजी शेतकऱ्यांनी शहराकडे जाणारा दूधपुरवठा बंद करावा संकलन केंद्रात दूध देऊ नका असे आवाहन पुण्यातील पत्रकार परिषद व क्रांती संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.
यावेळी धवलक्रांती संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश देशमुख शेतकरी ज्योतीराम गायकवाड व उपाध्यक्ष नेहा गायकवाड हे उपस्थित होते
सचिन देशमुख म्हणाले आपल्या परिश्रमाने दुधाचा महापूर आणून भारताला दुग्ध उत्पादना मध्ये गेले 20 वर्षापासून जगामध्ये प्रथम क्रमांकावर नेऊन ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या हातात काय आले हा प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे श्वेतक्रांती का नासली
हा मुद्दा महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात दूध उत्पादकांची वर्षा लाख 14 हजार 691 कोटी रुपयांची लूट होत आहे या समस्येवर कायमस्वरूपी धोरण ठरविण्याऐवजी अतिरिक्त दुधाचा कांगावा करून पुन्हा एकदा दूध संघाच्या घशात दुधाच्या भुकटीचे अनुदान घालण्याचा शासन विचार करीत आहे दुधाला ए फआरपी द्यावी अशी मागणी आहे त्यामुळे सरकारच्या या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दूध संघाच्या संघटित लुटीचा निषेध करण्यासाठी दूध उत्पादकांना न्याय मिळण्यासाठी शहराचा दूध पुरवठा बंद करावा असे आवाहन धवलक्रांती संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी केले.
धवलक्रांती संघर्ष समितीच्या मागण्या
1) ताज्या खर्चावर आधारित 15 टक्के नफा धरून दुधाला एस आर पी द्या
2) दूध भेसळ माफियांवर भरारी पथक व्हेन कडून तपासणी करून कडक कारवाई करा
3) ग्राहकांना गाईच्या दुधासाठी किमान विक्री प्रति 45 लिटर निर्धारित करा.
