पंकजा मुंडे यांच्या आंदोलनातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण


पुणे – मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्घाघाटन झाले तेव्हा कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली कार्यकर्त्यांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले तेव्हा भाजपचे मोठे नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर अजित पवारांवर व राष्ट्रवादी पक्षावर टीका केली आणि अनेक पक्षानि तर अजित पवारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आज ओबीसी आरक्षण आंदोलनात पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कोरोना च्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यात आले.

पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 1500 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक सुद्धा झाली पुण्यात अजूनही जन जीवन सुरळीत झाले नाही पुण्यातली दुकाने आज पर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती आता महापालिकेने नवीन आदेश काढून दुकाने सोमवारपासून चार वाजेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज ओबीसी समाजाला आरक्षण भेटावे म्हणून भाजपच्या वतीने महाराष्ट्रात आंदोलने करण्यात आली पुण्यात कात्रज चौकात पण आंदोलन झाले आंदोलनाच्यावेळी हजारो कार्यकर्ते एकत्र जमा झाले पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले त्या पण कोरोनाचे नियम विसरून आंदोलनाला बसले.

दोन महिने झाले मध्यमवगिय माणूस घरी बसून आहे लोकांचे रोजगार गेले आहेत लोक आपला कोरोना होईल म्हणून घरीच राहत आहेत या आंदोलनातून तिसऱ्या लाटेला आमंत्रण नाही का ? लोकप्रतिनिधी जनतेला या प्रश्नाचे उत्तर देणार का ?अजुन किती दिवस लोकांनी टाळेबंदीत राहनार ? कोरोना फक्त जनतेलाच होतो का तिसऱ्या लाटेलाआमंत्रण लोक प्रतिनिधी देणार का? असे प्रश्न नक्कीच जनतेला मनात पडत असणार.

Leave a Reply

%d bloggers like this: