fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsNATIONAL

शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल प्रज्ञा सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

भोपाळ – भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. यापूर्वीही अनेकदा प्रज्ञा सिंह यांनी शहीद अधिकारी हेमंत करकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान करत राजकीय वातावरण तापले होते.

हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील असे म्हणत प्रज्ञा सिंह यांनी वादाला तोंड फोडले आहे. यावर बोलताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त हे वेगळे विचार करतात. माझी माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आचार्य-शिक्षकांची बोटं आणि बरगड्या मोडल्या. त्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवले असेही प्रज्ञा सिंह म्हणाल्या. १९७५ साली देशात पहिल्यांदाच आणीबाणी जाहीर झाली. पण २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला अटक झाली तेव्हाही अशीच आणीबाणीसारखी स्थिती होती. असंही प्रज्ञा सिंह म्हणाल्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात १० जणांचा मृत्यू झाला होता तर ८२ जण जखमी झाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading