Pune – जाणून घ्या ‘स्पुटनिक व्ही’लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार

पुणे : केंद्र सरकारने लसीकरण मोहीम हातात घेतली असून मोठ्या प्रमाणात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतीय लसी बरोबरच विदेशी लसींना परवानगी देण्यात येत असून स्पुटनिक व्ही ही लस देशात दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबादमध्ये या स्पुटनिक व्ही लस देण्यात आल्यानंतर ही लस महाराष्ट्रात कधी दाखल होणार याची अनेकांना उत्सुकता लागली होती. स्पुटनिक व्ही लस आता पुणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. स्पुतनिक वी लसीचा एक डोस ११४२ रुपयांना खासगी रुग्णालयांमध्ये मिळेल.

पुणे शहरातील रुग्णालयांना स्पुटनिक व्ही लसीचे ६०० डोस पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले असून महाराष्ट्रातील स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस पुण्यात दिला गेला. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात एका ३६ वर्षीय व्यक्तीला स्पुतनिकची लस दिली गेल्याच डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. पुणेकरांना स्पुटनिक व्ही लस २८ जूनपासून उपलब्ध होईल, अशी माहिती देतानाच लस घेण्यासाठी कोविन ऍप आणि पोर्टलवर पूर्वनोंदणी करणं आवश्यक असल्याचं डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: