खडकवासला धरणात 33.84 टक्के पाणीसाठा जमा

पुणे: खडकवासला साखळीतील चार धरणात मिळून आज शुक्रवार  रोजी सकाळी सहा वाजता एकूण 9.11 टीएमसी म्हणजे 33.84 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त पाणीसाठामागील वर्षी आजच्या दिवशी चार ही धरणात मिळून 7.78 टीएमसी म्हणजे 21.65 टक्के पाणीसाठा जमा होता. यंदा तो 10.13टीएमसी म्हणजे 32.84टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजे मागील वर्षी पेक्षा 8.200 टीएमसी म्हणजे 95 टक्के जास्त पाणीसाठा जास्त जमा आहे.

टेमघरला येवा सुरु चार ही धरणात गुरुवारी  रोजी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली. चार ही धरणात मिळून 7.65 टीएमसी यंदाचा सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक होता. आज अखेर तो 10.12 टीएमसी म्हणजे झाला आहे. म्हणजे सात दिवस आज अखेर 2.590 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर मध्ये अनुक्रमे 87, 89 व 90 क्यूसेकने येवा जमा होत आहे. बुधवारी संध्याकाळी झाला पाऊस बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला टेमघर येथे पाऊसच पडला नाही.

पानशेत, वरसगाव येथे अवघा एक- एक मिलिमीटर पाऊस झाला होता. असे असले तरी बुधवारी संध्याकाळी पाच नंतर पाऊस वाढला. गुरुवार पहाटे सहा वाजे पर्यत खडकवासला 4, टेमघर येथे 20, पानशेत, वरसगाव येथे प्रत्येकी 7 तर दासवे लवासा 40मिलिमीटर पडला आहे. शनिवार पासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी झाला. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यातील वाढ देखील हळूहळू होत आहे.अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: