‘आर्किटेक्चर क्षेत्रातील उच्च शिक्षण ‘ विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ तर्फे आयोजित ‘आर्किटेक्चर क्षेत्रातील उच्च शिक्षण ‘ विषयावरील वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला. आर्किटेक्चर विद्याशाखेत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ ते २४ जून दरम्यान हे वेबिनार ऑनलाईन पार पडले. बारावीनंतर होणारी नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा ), आर्किटेक्चर अभ्यासक्रमाची केंद्रीय प्रवेशप्रक्रिया,पात्रता आणि कारकिर्दीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य लीना देबनाथ,ध्वनी अय्यर,नाझिया मिस्त्री,प्राची अय्यर यांनी मार्गदर्शन केले.
