गुणवत्ता आणि मेहनत केल्यावर यश तुमच्याकडे चालून येते – दत्ता भरणे

पुणे: एका खेडे गावातील सामान्य कुटुंबातील युवक पुण्यासारख्या ठिकाणी येऊन ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करतात ही बाब त्यांनी केलेल्या परिश्रमामुळे ,जिद्द,चिकाटी व सर्वात महत्वाची बाब म्हणजे गुणवत्ता दिली त्यामुळे नवउद्योजक म्हणून बिरुदावली त्यांच्या नावापाठीमागे लागेल हे नक्की असे मत राज्यमंत्री दत्तामामा भरणे व्यक्त केले.

हॉटेल धनगरवाडाच्या 4 थ्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी भरणे बोलत होते. यावेळी रासप चे अध्यक्ष महादेव जानकर, विश्वासराव देवकाते, सुरेश घुले, घनश्याम हाके, दत्तात्रय येळे , सुरेश कांबळे आदी उपस्थित होते. धनगरवाडाचे संचालक गणेश गोरे व किशोर गोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दोन्ही बंधुने जिद्द आणि मेहनतीनने उभं केलेला हा व्यवसाय मोठी भरारी घेत युवकां पुढे एक आदर्श निर्माण केल्याचं सांगितले.

महादेव जानकर म्हणाले; की व्यवसाय करण्यात काही लोकांनाच जमते ही बाब कायम गोरे बंधूनी मोडून काढून एक यशस्वी उद्योजक कडे वाटचाल केली.

Leave a Reply

%d bloggers like this: