बीड – सधन कुटुंबातील सदस्याना जळाऊ प्रवृत्तीतून मारहाण

बीड : बांध कोरला या क्षुल्लक कारणावरून कोळगाव येथील रंगनाथ करांडे व त्यांच्या मुलांना मारहाण करण्यात आल्याची घटना गेवराई येथे घडली. संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशन तांगडे यांनी गेवराई पोलिसांकडे केली आहे.

बांध कोरला म्हणून रंगनाथ करांडे यांना करण्यात आलेली मारहाण हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशन तांगडे यांनी केली. करांडे यांना बेदम मारहाण केल्यानंतर करांडे कुटुंबीयांनी तांगडे यांच्याकडे मदत मागितली. तात्काळ तांगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तांगडे यांनी करांडे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. त्यानंतर किशन तांगडे यांनी गेवराईचे पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड व चकलांबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय देशमुख यांना घटनेची माहिती देऊन अन्याय पीडितांना सर्वोतोपरी मदत करण्याची मागणी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: