मॅट्रीकपूर्व केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाईन पद्धतीने

मुंबई : कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध पातळ्यांवर निर्बंध आहेत. त्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासननिर्णय नुकताच नियोजन विभागाकडून काढण्यात आलेला आहे.

इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाकडून मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ही केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाने गठित केलेल्या समितीने मान्य केल्यामुळे इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना दि. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेतून वगळण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: