पाऊस -शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढविणारा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला

पुणे: शेतकऱ्यांसह सर्वांची चिंता वाढविणारा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. मॉन्सूनचे वारे कमकुवत असल्याने पुढील ७ दिवस मध्य भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेत मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे सांगितले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले आहे.

मॉन्सून ने यंदा नेहमीपेक्षा अगोदर आगमन केले.
आतापर्यंत त्याने देशातील बहुतांश भागात आगमन झाले आहे. राजस्थानाचा काही भाग, दिल्ली, हरियाना आणि पंजाबचा काही भागात अजून मॉन्सून पोहचला नाही. सध्या मॉन्सूनची सीमा रेषा बारमेर, भिडवाडा, धुलपूर, अलिगड, मिरत, अंबाला आणि अमृतसरअशी आहे.
सध्या मॉन्सूनचे वारे कमकुवत असल्याने येत्या ७ दिवसात देशाच्या बहुतांशी भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. तसेच मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

मॉन्सूनचे महाराष्ट्रा त आगमन लवकर झाले असले तरी तो जसा पुढे सरकला, तसा पावसाचा जोर कमी झाला आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षा राज्यात पाऊस अधिक झाला आहे. देशभरात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. देशातील ६९४ जिल्ह्यांपैकी २६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे.
२६० जिल्ह्यात खूप अधिक, १३३ जिल्ह्यात थोडा अधिक, १३९ जिल्ह्यात सरासरीइतका पाऊस झाला आहे. त्याचवेळी १३६ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, अकोला जिल्ह्यात खूप कमी पाऊस झाला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: