पुण्यात युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी डाबर ग्लुकोजची ‘एनर्जाईज इंडिया’ मोहिम सुरू
पुणे : डाबर समूहाचा आघाडीचा इंस्टंट एनर्जी ड्रिंक ब्रँड डाबर ग्लुकोज याने आज देशभरातील प्रमुख क्रीडा अकादम्यांमधील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऊर्जा व स्टॅमिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘एनर्जाईज इंडिया’ या भव्य मोहिमेची घोषणा केली.
या मोहिमेअंतर्गत डाबर ग्लुकोजने आज पुण्यातील स्टार बॉक्सिंग अकादमी येथे ऊर्जा आणि स्टॅमिना व्यवस्थापनाविषयी विशेष जनजागृती सत्राचे आयोजन केले. या सत्रात क्षेत्रातील नामांकित डॉक्टर आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. त्यांनी खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेने खेळण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी डाबरतर्फे अकादमीतील उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला.
यावेळी बोलताना डाबर इंडिया लिमिटेडचे हेल्थ सप्लिमेंट्स विभागाचे मार्केटिंग प्रमुख अमित गर्ग म्हणाले, “युवा खेळाडूंमध्ये ऊर्जा आणि स्टॅमिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच त्यांना त्यांच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ‘एनर्जाईज इंडिया’ मोहिमेची सुरुवात करत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. डाबर ग्लुकोज हा खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त असा ब्रँड आहे. शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना तत्काळ ऊर्जा मिळणे आवश्यक असते आणि डाबर ग्लुकोज त्यासाठी आदर्श पर्याय आहे.”
या कार्यक्रमाला डाबर इंडिया लिमिटेडचे दिनेश कुमार उपस्थित होते. बॉक्सिंग प्रशिक्षक निलेश खुडे यांनी घेतलेल्या ऊर्जा सत्रांमध्ये युवा खेळाडूंना योग्य पोषण आणि पुरेशा पाण्याच्या सेवनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच स्टॅमिना आणि सहनशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक टिप्स आणि तंत्रांची माहिती देण्यात आली.
अमित गर्ग पुढे म्हणाले, “डाबर ग्लुकोजने नेहमीच देशातील युवकांमध्ये निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन दिले आहे. युवा खेळाडूंशी केलेली ही भागीदारी त्या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्या ताजेतवाने चवीसह तत्काळ ऊर्जा देणारे डाबर ग्लुकोज हे युवा खेळाडूंना ऊर्जावान ठेवण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी योग्य पेय आहे.”
