Pune – पतित पावन संघटनेच्यावतीने संचेती हॉस्पिटल विरोधात आंदोलन

पुणे : पतित पावन संघटना पुणे शहरतर्फे संचेती हॉस्पीटल पुणे यांच्या विरोधात शिवाजीनगर येथे हॉस्पिटलसमोर आंदोलन करण्यात आले. ओमकार विनायक रोमदळ हा २० वर्षीय तरूण अपघातामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा एक पाय पूर्णपणे काढून टाकण्यात आला व तो कायमस्वरूपी अपंग झाला. संचेती हॉस्पिटलने आधी ३ लाख ५० हजार रुपये कोटेशन दिले व नंतर ७ लाख ५० हजार रुपयांचे बिल दिले. सदर मुलाची परिस्थितीत अत्यंत हलाखीची आहे. परंतु ४ दिवस झाले तरी, पूर्ण बिल न भरल्याच्या कारणावरून सदर तरूणाला संचेती हॉस्पीटल मधून सोडले जात नाही. यासाठी पतित पावन संघटनेच्यावतीने हॉस्पीटल विरोधात शांततामय पद्धतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी सिताराम खाडे, राजेश मोटे, दिनेश भिलारे, मनोज नायर, गोकुळ शेलार, श्रीकांत शिळीमकर, विजय गावडे, संतोष शेंडगे, ललित खंडाळे, विक्रम मराठे, योगेश वाडेकर, विजय क्षीरसागर, सूरज पोटे यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

धमार्दाय आयुक्त कार्यालयाकडून बिलाबाबत लेखी पत्रक देण्यात आले. परंतु हॉस्पिटल धमार्दाय आयुक्तांच्या अखत्यारीत येत नसल्याचे हॉस्पीटलकडून सांगण्यात आले.  नंतर पत्रक घेऊन सदर पत्रकाची काहीही दखल न घेता पुन्हा बिल भरण्यासाठी तगादा चालू आहे.

संघटनेचे गुरु कोळी म्हणाले, पतित पावन संघटना पुणे शहराने सदर प्रकरणामध्ये न्याय मागण्याचा प्रयत्न केला असता त्वरीत पोलिसांना फोन करून बोलवून पेशंट च्या नातेवाईकांना दमदाटी करण्यात आली. त्यामुळे सामान्य नागरिकाने कोणाकडे न्याय मागावा? असा प्रश्न निर्माण होत आहे. सदर तरुणास लवकरात लवकर संचेती हॉस्पिटल व्यवस्थापनाने ङिचार्ज केले नाही. तर पराग संचेती यांच्यासह सर्व संचेती व्यवस्थापनाला कायदेशीर कारवाई ला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: