पुण्यातील मराठी उद्योजकाची ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’द्वारे ओटीटी मनोरंजन विश्वात एन्ट्री
‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ द्वारे उदयोजक, पायाभूत सुविधा विकसक, सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मराठमोळे उद्योजक जीवन बबन जाधव राष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांचा ‘पिंग पॉंग’ नवा ओटीटी चॅनेल राष्ट्रीय भाषेत सुरु झाला आहे. ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी निर्मितीद्वारे भारतातील अस्सल हिंदी टॅलेंट जगभर पोहचविण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
भारतासह जगभरातील प्रेक्षकवर्ग ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला लाईक करीत आहे. ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’च्या काही हिंदी वेबसीरिज, वेब चित्रपट, लघुपट आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ओटीटी हे अल्पावधीतच जगभरात प्रचंड लोकप्रिय प्लॅटफॉर्म ठरले आहे. जगभरातील सर्वोत्तम टॅलेंट या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होत असल्याने प्रेक्षकांची रुची क्षणाक्षणाला बदलत असते. अद्ययावत तंत्रज्ञानासोबतच सर्वोत्तम भारतीय टेलेन्ट घेऊन ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट प्रा. लि.’ हे ओटीटी चॅनेल सज्ज झाले आहे.
‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’बाबत बोलताना जीवन बबन जाधव म्हणाले, मराठी माणूस हुशारी, मेहनत, प्रामाणिकपाणा आणि चिकाटी वृत्तीच्या जोरावर जगभरात यशस्वी आहे. नव्या आव्हानांचा सामना करण्यात मराठी उद्योजक अग्रेसर आहेत. आपल्या मातृभाषेसोबतच राष्ट्रीय हिंदी भाषेचा नेहमीच सन्मान करीत आला आहे. म्हणून मनोरंजन क्षेत्रात ओटीटी चॅनलद्वारे पदार्पण करीत असताना ते हिंदी असावे असे वाटत होते. जागतिक स्पर्धेत ‘पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ टिकून राहण्यासाठी अनोखे उपक्रमांसोबतच नवनवे टॅलेंट लॉन्च करणार आहे., पिंग पॉंग एंटरटेनमेंट’ने वेळेआधीच अपेक्षित टप्पा गाठून यशस्वी घोडदौड सुरु केली आहे. आमच्या वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, बॉलिवूड फिल्म्स सोबत इतर मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार आहेत, त्यासाठी आमची टॅलेंट रिसर्च मॅनेजमेंट टीम अहोरात्र कार्यरत आहे.
