बँक ऑफ इंडियातर्फे 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेबिनारचे आयोजन

बँक ऑफ इंडियातर्फे 21 जून 2021 रोजी 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (आयडीवाय) वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. महामारीच्या काळात समूहाने एकत्र येण्यावर निर्बंध असल्याच्या पार्श्वभूमीवर योग दिन साजरा करण्यासाठी डिजिटल मीडियाचा व्यापक करण्याच्या सरकारच्या सूचनांचे पालन करत या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमधे विविध राज्यांतील बँकेच्या शाखा/कार्यालयांतील 1000 कर्मचाऱ्यांनी प्रसिद्ध योग शिक्षिका श्रीमती कांचन भोसले यांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांच्या मदतीने समान योग शिष्टाचारांचे पालन केले गेले. या एका तासाच्या कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक, व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. ए. के दास, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या भाषणात सर्व सहभागींना योग ही आपली जीवनशैली बनवण्याचे तसेच त्याची मूल्ये कुटुंब, मित्रपरिवार, सहकारी व ग्राहकांमध्ये रूजवण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: