मुद्रांक शुल्कांत घट झाल्यास खरेदीदारांचा उत्साह वधारेल

नॉयडा :  मुद्रांक शुल्कात घट करण्यासारख्या सरकारच्या पुढाकारामुळे घर खरेदीत लक्षणीय वाढ होऊ शकते, कारण अद्यावत मॅजिकब्रिक्स कन्झ्युमर पोलनुसार ८० टक्के संभाव्य खरेदीदारांनी त्यांच्या राज्यांतील मुद्रांक शुल्कात घट झाल्यास घर खरेदीला प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले आहे.

देशभरात मालमत्तेची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क ५ ते ९ टक्क्यांदरम्यान आकारले जाते आणि त्यामुळे स्थावर मालमत्तेच्या किंमतीत लक्षणीय भर पडते. हीच बाब पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरते.

मात्र, २०२० मधे महामारी आल्यापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या राज्या सरकारांनी यापूर्वीच मुद्रांक शुल्कात कपात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गृहनिर्माण मंत्रालयानेही इतर राज्य सरकारांनाही मुद्रांक शुल्कात कपात करण्याचे आवाहन केले असून त्यामुळे घर खरेदीदारांवरील ओझे कमी होईल.

मॅजिकब्रिक्स या भारतातील पहिल्या क्रमांकाच्या प्रॉपर्टी साइटने घेतलेल्या अद्यावत पोलमधे तब्बल ८३ टक्के सहभागींना मुद्रांक शुल्कात घट झाल्यास आपल्याला घर खरेदीला प्रोत्साहन मिळेल असे वाटत असल्याचे मत व्यक्त केले, तर १७ टक्के जणांना याचा आपल्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम होईल असे वाटत नसल्याचे सांगितले.

ग्राहक मानसिकतेविषयी मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै म्हणाले, ‘मुद्रांक शुल्कात घट झाल्याच्या काळात – सप्टेंबर २०२० आणि मार्च २०२१ दरम्यान महाराष्ट्रातील गृह विक्रीत ११४ टक्के वाढ झाल्याचे आमचे निरीक्षण आहे. मात्र, मुद्रांक शुल्काचा कालावधी संपल्यापासून विक्रीमध्ये घट झाल्याचेही आम्ही पाहात आहोत. हे आमच्या प्लॅटफॉर्म्सवर घरांना तसेच कर्जासाठी दिसून येणाऱ्या मागणीशी प्रतिकुल आहे. वर्क फ्रॉम होम न्यू नॉर्मल झाल्यामुळे लोक जादा खोली असलेली मोठ्या आकाराची घरे शोधत असून राज्य सरकारांनी मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा व पर्यायाने घर खरेदीदारांवरील ओझे कमी करण्याचा विचार करावा.’

गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा विक्री व्यवहारात मुद्रांक शुल्कात सवलत जाहीर केली होती व त्यानंतर ते दोन टप्प्यांत मुद्रांक शुल्क कमी करणारे पहिले राज्य ठरले होते. यामुळे मालमत्ता व्यवहारांत तसेच राज्यातील नोंदणींमधे लक्षणीय वाढ झाली. कित्येक स्थावर मालमत्ता संघटना आणि समूह मुद्रांक शुल्क अनुदानाची मागणी करत असून इतर राज्ये महाराष्ट्राच्या मुद्राक शुल्क मॉडेलचे अनुकरण करतील असा अंदाज आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: