विद्या निकेतन शाळेत योग दिन व संगीत दिन उत्साहात साजरा
पुणे : बिबवेवाडी येथील विद्यानिकेतन शाळा येथे जागतिक योग दीना व जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.1ली ते 10 वीचे विद्यार्थी,शिक्षक,पालक असे सुमारे 1500 जन सहभागी झाले होते..
कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका छाया हब्बू आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जया श्रीनिवास यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाली..या वेळी आर्ट ऑफ लिविंग चे शिक्षक रघुराम नायर,जयपाल गुजांकुश,पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे,जयश्री पवार,वंदना गणेशन, सरोजा सूर्यवंशी,मनीषा कुलकर्णी आदी उपस्थित होते..कार्यक्रमाची सुरुवात क्रीडाशिक्षक साहेबराव जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली..या वेळी संचित कुलकर्णी, सिद्धी कुलकर्णी, कुशल महाजन यांच्या योगासनांची प्रात्यक्षिके सादर झाली..या वेळी सर्वांनी सोपी आसने,प्राणायाम ओंकार जप आणि श्वसनाचे व्यायाम यांचा सर्व केला. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने तेजस्विनी धारगळकर, अनघा करजूले,अनुष्का व्हटकर,सानिका जोशी, सिद्धी कुलकर्णी, कुशल महाजन,गार्गी रणावरे, रिद्धी गावंडे यांनी आपल्या विविध कला सादर केल्या..या वेळी प्रमुख पाहुणे रघुराम नायर यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि एकाग्रते साठी योगाभ्यास या विषयावर मार्गदर्शन केले. अंजली चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.
