fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

Pune – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : नगरसेवक पदाचा गैरवापर करून नगरसेवकाने जुन्या सायकली दुरुस्त करणाऱ्या व्यावसायिकाच्या घरावरील मोबाईल टॉवर पाडून तसेच घरही पाडण्याची धमकी देत मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरुन व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथे घडली.

संजय महादेव सुर्वे (वय 53, रा. दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शशांक संजय सुर्वे (वय 26 ) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन भाजप नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साईबाबा मंदिराजवळ, दत्तवाडी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, जाणीवपुर्वक अपमानित करुन मानसिक त्रास देणे व धमकी देणे, या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सुर्वे यांचे म्हसोबा चौकामध्ये “पौर्णिमा सायकल मार्ट’ नावाचे जुन्या सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. सुर्वे यांनी त्यांच्या मालकीच्या “महादेव बिल्डींग’च्या छतावर खाजगी मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता.

सुर्वे हे दत्तवाडी प्रभाग क्रमांक 29 मध्ये राहात असताना प्रभाग क्रमांक 30 चे नगरसेवक आनंद रिठे याने महापालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र सुर्वे यांनी रिठे यास पैसे दिले नाहीत. त्यामुळे त्याने महापालिकेकडे अर्ज करून नगरसेवक पदाचा गैरवापर करून फिर्यादीच्या वडीलांच्या बिल्डींगच्या छतावरील रिलायन्स कंपनीचा नवीन टॉवर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फौजफाटा आणून 10 जुन रोजी काढून टाकला. त्यानंतर सुर्वे यांचे राहते घर देखील पाडून टाकणार अशी धमकी देऊन फिर्यादीच्या वडीलांना रिठे याने सतत मानसिक त्रास दिला त्यामुळे सुर्वे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading