Pune – ईडीकडून बिल्डर अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त!
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची ईडीने तब्बल ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अविनाश भोसले यांच्यावर फेमा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि नागपूरमधील त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यापूर्वी विविध प्रकरणात अविनाश भोसले यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यांच्या मुलाची सुद्धा यापूर्वी चौकशी करण्यात आली होती.
भोसले यांचा बाणेर रस्त्यावर बंगला आहे. गणेशखिंड रस्त्यावर व्यावसायिक कार्यालय आहेत. राजकीय नेत्यांबरोबर घनिष्ट संबंध असलेल्या भोसले यांनी अनेक मोठे बांधकाम प्रकल्प साकारले आहेत. राजकीय नेत्यांबरोबर असलेल्या सलगीमुळे भोसले कायम चर्चेत राहिले आहेत.
