न्यु आर्या फाउंडेशन च्या वतीने जागतिक योगदिन साजरा

पुणे – न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने सिंहगड रोड येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

शरन्या योगा यांच्या माध्यमातून योगा चे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, या वेळी योगा साठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला, यावेळी योगगुरु ऊज्वला नवघने यांनी मार्गदर्शन केले . तसेच स्नेहल शिंदे , गौरी अतिवाडकर , किरण क्षीरसागर , प्रियांका घाडगे यांनी यावेळी योगासनाचे प्रात्यक्षिके सादर केली . योगा केल्यावर शरीर तंदरुस्त राहते, आजार नाहीसे होतात , योगा करणे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे असं मान्यवरांनी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक हरिश्चंद्र दांगट, संतोष कदम, सविता जोशी, डॉ. भवाळकर, योगा प्रशिक्षण कैलास गरगटे, देवेंद्र शूर, रामचंद्र पोळेकर , केतन ताम्हणकर, श्रीनाथ लोखंडे, राजेंद्र वाघ उपस्थित होते विशेष सहकार्य निलेश गांधी (अकलूज) वैशाली पाटील यांचे लाभले .या कार्यक्रमाचे आयोजन न्यु आर्या फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले तर आभार व्यंकटसाई होंडा यांनी व्यक्त केले .

Leave a Reply

%d bloggers like this: