साऊंड, लाइट  व्यवसायाला शासनाने आर्थिक मदत करावी, पुणे साऊंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनची मागणी

पुणे – कोरोना संसर्गामुळे  दीड वर्षांपासून बहुतांश व्यवसायांना  मोठा फटका  बसला आहे. मात्र साऊंड, लाइट  व्यवसायाला अद्याप चालना मिळालेली नाही. सध्या हे व्यावसायिक व अवलंबून असलेले कर्मचारी आर्थिक अडचणीत  आले आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत   करावी, अशी मागणी पुणे साऊंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू कांबळे यांनी पुण्यातील पत्रकार  परिषद मागणी केली.

पुण्यात साऊंड, लाइट, जनरेटरचे सुमारे पाच ते सहा हजार व्यावसायिक आहेत. या व्यवसायांवर २० ते २५ हजार कामगार अवलंबून आहेत. यामध्ये साऊंड इंजिनिअर, मदतनीस, इलेक्ट्रिशियन आदींचा समावेश आहे. मात्र कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांवर बंदी असल्याने उत्पन्न थांबले आहे. त्यामुळे घराची जबाबदारी, साऊंड-लाइट सारख्या उपकरणांच्या खरेदीसाठी बँकेचे हप्ते, व्याज, कर्मचाऱ्यांचे पगार अशा अनेक गोष्टींचा खर्च भागविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने या व्यावसायिकांकडे लक्ष केंद्रित करत हा व्यवसाय पूर्वपदावर येईपर्यंत आर्थिक मदत म्हणून कर्जाचे व्याज माफ करावे, किंवा बँकेचे हप्ते काही काळासाठी पुढे ढकलावेत.’

नव्याने दुसरा व्यवसाय सुरू करण्यात अडचणी नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल नाही तर काही व्यावसायिकांनी हा व्यवसाय बंद केला आहे कोरोनामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. नव्याने कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल नाही. त्यामुळे आता शासनाने लक्ष द्यावे. घेतलेल्या कर्जासाठी सवलती द्याव्यात. आता गणपती उत्सव जवळ आला असून मंडळांनी व्यावसायिकांकडे लक्ष दिल्यास काही प्रमाणात व्यवसायाला चालना मिळेल. असे राजू कांबळे म्हणाले पत्रकार परिषदेत पुण्यातील साऊंड मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: