प्रसारमाध्यमावरची बंदी उठवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे महापालिकेत आंदोलन

पुणे – महापालिका वार्तांकन करण्यासाठी प्रसार माध्यमावर सत्ताधारी भाजपने बंदी घातली आहे. महापालिका मधील प्रसार माध्यमावरील बंदी उठली पाहिजे यामागणीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने महापौराच्या ऑफिस समोर आंदोलन केले लोकशाही वर बंदी टाकू नका  बंदी उठानी पडेगी
दादागिरी नही चलेगी या घोषणा देत आंदोलन केले 

या आंदोलनाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे आबा बागुल, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ व काँग्रेस राष्ट्रवादी चे नगरसेवक उपस्थित होते.
राष्ट्रवादी  चे शहराध्यक्ष  प्रशांत जगताप म्हणाले, सत्ताधारी भाजप पक्ष माध्यमांपासून काहीतरी लपवत आहे, महापालिका तून सत्ताधारी  भाजपच्या नगरसेवकांना जो निधी भेटतो त्या निधीतून प्रभागातील जी कामे व्हायला पाहिजेत ती दिसुन येत नाहीयेत पत्रकारांपासून ही माहिती लपवत आहेत असा आरोप प्रशांत कदम यांनी भाजप वर केला महापौरांचा ऑफिस समोर हे आंदोलन करण्यात आले पण महापौर त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिले या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले.

Leave a Reply

%d bloggers like this: