‘त्या’ आई – मुलानंतर आता पित्याचा मृतदेह आढल्याने खळबळ

पुणे – आई आणि लहान मुलांचा खून करून त्या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या प्रकरणात पोलिस बेपत्ता असलेल्या आबिद अब्दुल शेख याचा शोध घेत होते. मात्र शुक्रवारी सकाळी मआबिद अब्दुल शेख याचा मृतदेह आढल्याने या प्रकरणात गुंतागुंत वाढली असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

आबिद अब्दुल शेख (वय 38) असे मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आयान आबिद शेख (वय 7) आणि आलीया आबिद शेख (वय 35) या आई – मुलाचा खुन झालेला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर येथील एका नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर हवेली पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करण्यात आली.

त्यात तो मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस यांनी तात्काळ पुणे पोलिसांना दिली.
त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खात्रीसाठी पथकाने आता धाव घेतली आहे.
दरम्यान, त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे नेमकं घडलं काय याच गूढ अद्यापही उलगडलेले नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: