राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आबा बागुल यांच्यातर्फे तर्फे मोफत छत्री वाटप
पुणे – कोरोनाची सद्यस्थिती आणि लोकांचे होत असलेले हाल या भावनेतून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो काँग्रेसचे गटनेते नगरसेवक आबा बागुल यांच्या वतीने नागरिकांना राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ऐन पावसाळ्यात छत्रीचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, अभय छाजेड, इंदिरा आहिरे, अमित बागुल व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक आबा बागूल म्हणाले की, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि कोरोनाची सद्यस्थिती पाहता लोकांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. प्रत्येकाने जर आपल्या शेजारच्या ला थोडीशी मदत केली तर माणुसकीची भावना जपली जाईल व यातूनच एक चांगला समाज निर्माण होण्याचे काम प्रत्येकाच्या हातून होईल.
रमेश बागवे म्हणाले, पुणे शहरात हा फक्त एकच प्रभाग आहे जिथे कोरोना काळात या प्रभागातील गरजू नागरिकांना जास्तीत जास्त मदत आबा बागुल यांनी केली आहे खरंतर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यांनी पुण्यातील सगळ्या प्रभागात गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत केली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही काँग्रेस पक्ष आबा बागुल यांचे काम बघून नक्कीच पक्षात मोठी संधी देईल.
अभय छाजेड म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आधी सांगितले होते की मोठ काहीतरी संकट येणार आहे पण आरोग्यमंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केले आख्या भारतात लसीकरण व्हावे मी राहुल गांधी यांची पहिली मागणी होती. प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
