अनलॉक नंतर पुणेकरांची विविध मॉल्स मध्ये गर्दी

पुणे – राज्य शासनाने कोरोनाचे रूग्ण कमी होत असल्यामुळे हळुहळू  टाळेबंदी उठवायला सुरवात केली आहे. पुणे शहरातही टाळेबंदी उठवली असून शासनाने सकाळी 7 ते सध्याकाळी 7 वाजेपर्यंत मॉल्स ,दुकाने उघडायाला परवानगी दिली आहे.  परिणामी आता  पुण्यातील विविध  मॉल मध्ये ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे. 

मॉल  व्यवस्थापणांच्या वतीने कोरोना काळातील नियमांचे पालन होईल यासाठी विविध उपाययोजना केल्याचे दिसते. सातारा रोड येथील डी मार्ट, मगरपट्टा येथील अमनोरा पार्क आदि विविध ठिकाणी  ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.
या विषयी बोलताना D mart चे व्यवस्थापक राजू चोरडिया म्हणाले, टाळेबंदी मुळे खूप नुकसान झाले आहे .शासनाने आम्हाला सध्याकाळी 7 पर्यंत मॉल्स उद्यडन्यास परवानगी दिली आहे आम्ही शासनाचे आभार मानतो .सोमवार पासून मॉल उघडले पहिल्या दिवसापासून लोकानीं जीवनावशक वस्तू, कपडे खरेदी  करायाला गर्दी केली आहे. आम्ही प्रत्येक ग्राहकाचे हात सॅनिटाइजर करत आहोत. मॉल मध्ये येणारा प्रत्येक ग्राहक ग्राहकाचे टेंपरेचर चेक करत आहोत. प्रत्येक ग्राहकाला सोशल डिस्टंसिंग चा वापर करायला वारंवार करत आहोत.

आम्ही कोरोनामुळे व  टाळेबंदी मुळे 2 महिने घरात होतो आम्ही कोरा नाचे सगळे नियम पाळून मॉलमध्ये खरेदी केली. दोन महिन्यानंतर घरातून बाहेर पडायला भेटले .आज खूप भारी वाटत आहे.
पुण्यातील टाळेबंदी उठल्यामुळे लोक मॉल, दुकाने मध्ये गर्दी करतासे दिसून आले. रस्त्यावर वर वाहतूक पण खूप दिसून आली.


– स्नेहा गायकवाड, ग्राहक

Leave a Reply

%d bloggers like this: