महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे ईस्टेट एजंट,,,ते पुणेकरांची फसवणुक करीत आहेत : प्रशांत जगताप यांचा आराेप
पुणे – शहर सुधारणा समिती पाठाेपाठ स्थायी समितीने महापालिकेच्या ताब्यातील आणि भाडेतत्वावर दिलेल्या सुमारे १ हजार २६० सदनिका विकण्यास मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काॅंग्रेसने फेरप्रस्ताव दाखल केल्याची माहीती जगताप यांनी दिली.
महापालिकेच्या मालकीच्या सदनिकांची विक्री करण्याचा निर्णय हा बांधकाम व्यावसायीकांच्या फायद्यासाठी घेतला जात आहे. यात काेट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार हाेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचा विराेध असल्याची माहीती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परीषेदत दिली. तसेच भाजपचे पदाधिकारी हे ईस्टेट एजंट झाल्याचा आराेपही जगताप यांनी केला.
या पत्रकार परीषदेला महापालिकेतील विराेधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ या उपस्थित हाेत्या. महापालिकेची आर्थिकस्थिती चांगली असुन, २२०० काेटी रुपयांच्या ठेवी आहेत. महापालिकेकडे आर्थिक दुर्बल घटक आणि आर सेवन या तरतुदीनुसार तीन हजाराहून अधिक सदनिका ताब्यात आल्या आहेत. आर्थिक स्थिती चांगली नसल्याचा बनाव करून या सदनिका बांधकाम व्यावसाियकांच्या हितासाठी विक्रीला काढल्या जात आहे. यात काेट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार हाेण्याची शक्यता आहे. बनावट कागदपत्रे तयार करून या सदनिका संबंधित बांधकाम व्यावसायीकच कमी किंमतीत म्हणजे रेडीरेकनरच्या दरानुसार खरेदी करण्याची शक्यता आहे. यामुळे महापालिकेचे माेठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान हाेणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी हे ईस्टेट एजंट झाले असुन, ते पुणेकरांची फसवणुक करीत आहे असा आराेपही जगताप यांनी केला.
