पुणे शहरात दिवसभरात 321 रुग्ण कोरोना मुक्त
पुणे – पुणे शहरामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही दिवसापासून शहरांमध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्णांची संख्या अधिक आहे.
पुणे शहरामध्ये दिवसभरात 295 नवीन रुग्णांची नोंद झाले आहे तर 321 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे पुणे शहरात आज पर्यंत 4 लाख 74हजार 480 इतके कोरोना बाधित रुग्ण अजून आले आहेत पुण्यात दिवसभरात 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील 20 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5958स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत शहरांमध्ये सध्या 2738रुग्ण गंभीर आहेत तर 451 रुग्ण ऑक्सीजन वर उपचार घेत आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
