हगारेवाडी च्या सरपंच रेश्मा सुर्यवंशी यांनी घेतली शरद पवार यांची भेट

पुणे – हगारेवाडी(ता.इंदापूर)या गावाच्या उच्च शिक्षित महिला सरपंच रेश्मा स्वप्नील सूर्यवंशी यांनी गावाला विकासात आदर्श मॉडेल बनविण्यासाठी उत्तम मार्गदर्शनाची गरज व साथ मिळावी म्हणून थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली.

हगारेवाडी (ता.इंदापूर) यां गावच्या सरपंच पदी फेब्रुवारी २०२१ मध्ये विराजमान झालेल्या रेश्मा स्वप्नील सुर्यवंशी या महिला सरपंच यांनी मंगळवार(दि १५)रोजी बारामती गोविंदबाग येथे शरद पवार यांची भेट घेऊन बारामती शहर व काटेवाडी या गावासारखे वीज, रस्ते, पाणी, स्वच्छता सह आरोग्यविषयक सह अन्य विकासकामे आपल्या हगारेवाडी या ग्रामीण भागातील छोट्याशा गावात करून गाव विकासात आदर्श बनविण्यासाठी साहेब मी राजकारणात नविन आहे मला तुमचे व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाची गरज असून विकासकामात देखिल साथ पाहिजे असे यावेळी सरपंच रेश्मा सुर्यवंशी यांनी शरद पवार यांच्या कडे मागणी केली. बारामती येथील शारदानगर शिक्षण संकूलातुन एम. कॉम चे उच्च शिक्षण घेतलेल्या व राजकारणात काही महिन्यापूर्वी प्रवेश करून नवनिर्वाचित सरपंचपदी विराजित झालेल्या रेश्मा सुर्यवंशी या अतिशय धडाडीने गावाचा विकास करीत आहेत.

याप्रसंगी तुम्हाला सर्वेतोपरी मार्गदर्शन सहकार्य व विकासकामात सहकार्य राहिल अशी ग्वाही यावेळी खासदार शरद पवार यांनी सरपंच रेश्मा सुर्यवंशी यांना दिली. यावेळी स्वप्नील सुर्यवंशी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: