साउथच्या अभिनेत्रीला ड्रग्ज घेताना अटक

मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युला काल एक वर्ष पूर्ण झाल. त्यांच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये ड्रग्जचे रॅकेट पसरले असल्याचे उघड झाले होते. नुकतेच एका साउथच्या अभिनेत्रीला मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री नायरा नेहल शाह ही मुंबईतील जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. या पार्टीत ड्रग्स घेतले जात आहे, चरसने भरलेली सिगारेट असून ती सिगारेट अभिनेत्री ओढत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार मुंबई पोलिसांनी कारवाई करून नायरासह तिच्या मित्रांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: