कोरोना लसीकरण – देशातील पहिल्या मृत्यूची नोंद

नवी दिल्ली – देशात कोरोना लस दिल्यानंतर एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने गठित केलेल्या पॅनलच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.

लसीकरणानंतर गंभीर आजार किंवा मृत्यू झाल्यास याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन (AEFI) म्हणतात. केंद्र सरकारने AEFI साठी समिती गठीत केली आहे.या समितीने लसीनंतर ३१ मृत्यूंचे आकलन केल्यानंतर, लस घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. ही एक प्रकारची अ‍ॅलर्जी आहे. AEFI समितीचे चेअरमन डॉ. एनके अरोरा यांनी लशीमुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

‘अ‍ॅनाफिलेक्सिसचे आणखी दोन प्रकरण समोर आले होते. या दोघांना १६ जानेवारी आणि १९ जानेवारी रोजी लस दिली होती. यामध्ये एक २२ वर्षांची आणि एक २१ वर्षांची व्यक्ती होती. त्यांना वेगवेगळी लस देण्यात आली होती. रुग्णालयात भरती केल्यानंतर दोघेही बरे झाले.’ तसेच ‘हजार जणांमध्ये एकाला ही अ‍ॅलर्जी होते. लसीकरणानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार मिळणे आवश्यक आहे. ३० हजार ते ५० हजारांपैकी एकाला अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा तीव्र अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात, ही लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्यावे.’

Leave a Reply

%d bloggers like this: