आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

पुणे – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना पुणे उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच  शिवसेना वर्धापन दिनाचे औचित्यनिमित्त दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप, रिक्षाचालक, गरजूंना धान्य वाटप,आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण तसेच पुणे शहर पोलिसांना लोखंडी बॅरिकेट आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

शिवसेना पुणे उपशहर प्रमुख व महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान अध्यक्ष, मंडई विद्यापीठ कट्टा पुणेचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे याच्या आयोजनातुन करण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना पच्छिम महाराष्ट्र समन्वयक रविंद्र मिर्लेकर, पुणे शहर संपर्क प्रमुख बाळाभाई कदम, पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्या सह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: