हिंद तरुण मंडळा च्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पुणे – हिंद तरुण मंडळ कॅम्प ट्रस्ट पुणे यांच्यावतीने आज पुणे शहरातील कोरोना योध्यानचा सन्मान हिंद तरुण मंडळाच्या आवारात करण्यात आला.

यासमयी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनीलभाऊ कांबळे व लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम उपस्थीत होते.

यावेळी पुणे शहरात कोरोना काळात मागील दिड वर्ष कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असणाऱ्या स्वरूपवर्धिनी संस्था, उन्मत संस्था, कर्तव्य फाउंडेशन, मनजीत सिंग विरदी संस्था, गोसावीपुरा सार्वजनिक मंडळ तसेच इतर सामाजीक संस्थेच्या कार्यरत कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मागील अनेक वर्षे कामाठीपुरा मंडळ व हिंद तरुण मंडळ भागात सर्व जातीच्या भिंती भेदून अंत्यसंस्कार करणारे श्री विजय हिब्बारे व नितीन बत्तेलू यांचा आमदार श्री सुनील कांबळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार सुनील कांबळे, समाजसेवक प्रशांत यादव, संदिप भोसले, विकास भांबुरे, प्रशांत मते,दिलीप गिरमकर आदी मान्यवरांची भाषणे झाली.
सर्व मान्यवरांनी आमदार सुनील कांबळे यांनी कोरोना काळात पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड संचलीत हॉस्पिटलला रुपये 5 कोटी रुपयाची आर्थिक मदत तसेच सर्व वार्डात लसीकरण केंद्र सुरू केल्याबद्दल आभार मानले.

यावेळी बोलताना आमदार सुनील कांबळे यांनी सध्या सुरू असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी आवाहन केले तसेच सर्व नागरीकांनी आत्मनिर्भर बनावे स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले तर विकास भांबुरे, प्रशांत मते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सर्व नागरिकांना कोरोनाला रोखण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश भोज यांनी केले तर आभार शअतिष कुऱ्हाडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सन्नी कुऱ्हाडे, संदिप आगुरेडी, नितीन बत्तेलू, राजेंद्र गिरमकर, निखिल बत्तेलू, पवन परदेशी, संदेश मांजरेकर, दिपक कुऱ्हाडे, सौरभ परदेशी, गणेश तिप्पापुरकर, नयन साखरे, आर्यन कुऱ्हाडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

%d bloggers like this: