Pune unlock – जाणून घ्या: 14 जून पासून काय बंद काय सुरू


पुणे – कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुपारीच याबाबत संकेत दिले होते. त्यानुसार आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात प्रामुख्याने अभ्यासिका, व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, कोचिंग क्लासेस आदी गोष्टी अटीशर्थींसह सुरु करण्यात येणार आहे.
मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालयांना परवानगी देण्यात आली असून उपस्थितीची मर्यादा क्षमतेच्या 50 टक्के असेल.

व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील. मात्र, सदर ठिकाणी वातानुकूल सुविधा वापरता येणार नाही.
मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरु राहतील.
पुणे मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालयांना परवानगी देण्यात आली असून उपस्थितीची मर्यादा क्षमतेच्या 50 टक्के असेल.
कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
मॉल 50 टक्के क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र, सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
सोमवारपासून आस्थापनांना सायं. 7 पर्यंत सुरु ठेवता येणार.
अत्यावश्यक दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.
अभ्यासिका, ग्रंथालय आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील.
पुणे महानगरपलिका क्षेत्रामधील बांधकामे नियमितपणे सुरु राहतील.
ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.
अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.
विविध बैठका, सभा, स्थानिक संस्था तसेच सहकारी संस्थांच्या मुख्य सभा 50 टक्के उपस्थितीत घेणेस परवानगी राहील.
रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहील.
उद्याने, खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस स. 5 ते 9 व दु. 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.

Leave a Reply

%d bloggers like this: