Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

दिलासादायक पुणे शहरात दिवसभरात 367 रुग्ण कोरोनामुक्त

पुणे : पुणे शहरात गेल्या 24 तासात 239 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली. सध्या शहरामध्ये 3 हजार 320 इतके सक्रीय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सक्री रुग्णांची संख्या कमी झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 73 हजार 539 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 61 हजार 763 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8456 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6076 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 519 रुग्ण गंभीर आहेत. तर 923 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज पर्यंत शहरात 25 लाख 67 हजार 412 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading