बजाज अलियान्झतर्फे 1156 कोटी रुपये बोनस जाहीर

पुणे – बजाज अलियान्झ या भारतातील आघाडीच्या खासगी जीवन विमा कंपनीने आपल्या विमाधारकांसाठी 1156 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. यामधे 315 कोटी रुपयांच्या एकाच वेळेच्या विशेष बोनसचाही समावेश असून तो नेहमीच्या बोनसच्या व्यतिरिक्त दिला जाणार आहे. सध्याच्या कठीण काळात ग्राहकांना आपली जीवनध्येये साकार करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळावा या उद्देशाने कंपनीने हा बोनस जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2020- 21 चा हा बोनस कंपनीच्या सहभागी विमाधारकांच्या निधीतून तयार झालेल्या नफ्यातून देण्यात येणार आहे. या बोनसमुळे कंपनीमधे आपली गुंतवणूक आणि विश्वास कायम ठेवणाऱ्या 12 लाख (11,99,612) विमाधारकांना लाभ होणार आहे.

बोनस जाहीर करण्याचे कंपनीचे हे सलग 20 वे वर्ष असून कंपनीने आपल्या विमाधारकांना दीर्घकालीन मूल्य मिळवून दिले आहे.

कंपनीने जाहीर केलेला बोनस 31 मार्च 2021 रोजी विम्याच्या पूर्ण व खात्रीशीर रकमेसह कार्यान्वित असलेल्या आणि नियमितपणे प्रीमियम भरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्व उत्पादनांच्या विम्यावर दिला जाणार आहे. विशेष बोनस आणि नेहमीचा प्रत्यावर्ती बोनस योजनेची मुदत संपल्यावर किंवा विमाधारकाचा मृत्यू झाल्यास दिला जाणार आहे.

या घोषणेविषयी बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण चौघ म्हणाले, ‘सध्याच्या कठीण काळात कर्मचारी आणि ग्राहक हेच आमचे प्रथम प्राधान्य आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक जण विशेषतः ग्राहका साथ देण्यासाठी, त्यांची जीवनध्येये योग्य मार्गावर राहातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक तो सर्व पाठिंबा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. हा विशेष बोनस आमच्या ग्राहकांना आनंदी करेलच शिवाय त्यांना आपल्या जीवनध्येयांवरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रेरणा देईल अशी खात्री आहे.’

बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीला केयरचे एएए रेटिंह असून हे जीवन विमा पुरवठादार कंपनीच्या दाव्यांची रक्कम देण्याच्या क्षमतेला मिळालेल्या सर्वात मोठ्या रेटिंगचे निदर्शक आहे. यातून कंपनीची क्लेम सेटल करण्याची आर्थिक ताकद दिसून येते. कंपनीचे क्लेम सेटलमेंटचे गुणोत्तर 98.48 टक्के असून एकदिवसीय क्लेम मंजुरी प्रक्रिया असते (आर्थिक वर्ष 20-21 ची माहिती).

Leave a Reply

%d bloggers like this: