पुणे पोलीसांचा विशेष प्रकल्प “माय सेफ पुणे”

 

पुणे – शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतून पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल यांचे दैनिक पेट्रोलिंग/गस्तीसाठी “माय सेफ पुणे” अॅप तयार करणेत आले आहे.

सदर अॅपचे सहाय्याने पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल हे हृद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्हयास प्रतिबंध होणेकरीता महत्वाचे ठिकाणी भेटी देऊन किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणी सेल्फी फोटो काढून माय सेफ पुणे अॅपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे Latitude & Longitude व वेळ नोंद होते. अॅपवरून पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये पेट्रोलींग करत आहे याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरूपी अॅप मध्ये उपलब्ध राहते. सदर अॅपचे प्रत्यक्षिक हे मा. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त परि-४ यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.

दि. ११ जुन २०२१ रोजी माय सेफ पुणे या अॅपचे लोकार्पण सोहळा मा. अजित पवार सो उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते व मा. दिलीप वळसे पाटील, गृह मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थीतीत होणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: