आघाडी सरकारचे दिवस भरले – सिद्धार्थ शिरोळे

पुणे – राज्यातले आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे जनता या सरकारला कंटाळली असून या आघाडी सरकारचे दिवस आता भरले असल्याचे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या मार्फत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना जीवनावश्यक साहित्य तसेच रिक्षाचालकांना सीएनजी कुपन व मास्क आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते वाटण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, शिवाजीनगर मतदार संघाचे अद्यक्ष रवींद्र साळेगावकर, पुणे शहर झोपडपट्टी आघाडी उपाध्यक्ष राजू पिल्ले, गणेश बगाडे, आनंद छाजेड, प्रतुल जागडे,  किरण आरसे, अनिल भिसे,  जयेश जोशी, सचीन अंकेल्लू, उपाध्यक्ष संकेत कांबळे, धर्मेश शहा, नेहा गोरे, हर्षनिल शेळके,  सुप्रीम चौन्धे, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार केदारी, रोहित भिसे, अजित पवार, अरुण बागडी, जितेंद्र गायकवाड, सुनील दैठणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शिरोळे म्हणाले, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच मागासवर्गीयांना पदोन्नतीमधील आरक्षण या सरकारमुळे अडचणीत आले. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपोळून निघाला. संक्रमण टाळण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदी घोषित केली.  याकाळात सर्वसामान्य लोक, मध्यम व छोटे व्यापारी, रिक्षाचालक तसेच अन्य अनेक क्षेत्रातील लोक भरडले गेले. मात्र राज्यसरकारने लहान व मध्यम व्यापाऱ्यांना मदत केली नाही. रिक्षाचालक तसेच घरेलू कामगारांना तकलादू मदत केली. सरकार मधील तीनही पक्षांमध्ये समन्वय नाही. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी प्रत्येक वेळी सरकार आपल्या अपयशाचे खापर केंद्र सरकारवर फोडत आहे. सर्वसामान्यांना मदत न करता हे सरकार राजकारण करण्यात दंग आहे. म्हणूनच राज्यातली जनता सुद्धा या सरकारला वैतागली आहे. त्यामुळे लवकरच हे भ्रष्ट सरकार जाऊन राज्यात सुशासन येईल.

यावेळी सुनील माने म्हणाले, चंद्रकांत पाटील हे राज्यातले एक आदर्श राजकारणी आहेत. राजकीय जीवनात कार्यरत असताना त्यांचा समाजकारणावर जास्त विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांना मास्क आणि सीएनजी कुपन वाटप केले

Leave a Reply

%d bloggers like this: