पोलीस अधिकाऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

पुणे – नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित नेत्रदान प्रसार मोहिमेमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नेत्रदानाचे फॉर्म भरून याविषयी समाजामध्ये जनजागृती करण्याचा संकल्प केला. सहाय्यक सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी नेत्रदान समज-गैरसमज या विषयावर पोलीस बांधवांना मार्गदर्शन केले.
सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग सौ. सुषमा चव्हाण यांनी स्वतः नेत्रदानाचा फॉर्म भरून या उपक्रमाचा शुभारंभ केला व जास्तीत जास्त पोलीस बांधवांनी याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.
गेली २१वर्षे भोई प्रतिष्ठानच्या वतीने नेत्रदान प्रसार मोहीम सुरू असून यामध्ये आत्तापर्यंत 7300 जागरूक नागरिकांनी नेत्रदाना चे फॉर्म भरले आहेत
या मोहिमेमध्ये स्व.बाळासाहेब भारदे, स्व. तात्यासाहेब गोडसे ,स्व . मोहन धारिया, स्व. प्रभाकर पणशीकर, यांच्यासोबतच पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जयंत नारळीकर, बाबासाहेब पुरंदरे, विक्रम गोखले, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. विजय केळकर, सौ अलका कुबल , संगीतकार प्यारेलालजी, डॉ. शा. ब. मुजुमदार आदी मान्यवरांचा समावेश आहे .
सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र यांच्या जन्मदिनानिमित्त व स्मृतिदना निमित्त 10 जून हा नेत्रदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेत्रतज्ञ डॉ. नितीन कोलते, डॉ. विजय कुंभार, डॉ.पंकज आसावा,डॉ मंगेश लिंगायत, महेंद्र आगरवाल आणि पूना आय केअर,यश हॉस्पिटल, हडपसर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले .

Leave a Reply

%d bloggers like this: