बॅटल बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एमएमईएफला ब्रिक स्कूल पीपल्स चॉईस पुरस्कार

 पुणे – बिओयुएन आणि यूएनआय  यांनी आयोजित केलेल्या बेटर बस स्टॉप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एसएमईएफ (सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ) च्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी भविष्यातील बस स्टॉप कसे असावेत या विषयावर एक कल्पनाचित्र विकसित केले. त्यांच्या या प्रवेशिकेला जगभरातून आलेल्या २७ प्रवेशिकांमध्ये स्थान मिळाले. या २७ मध्ये ३ भारतातून आल्या होत्या.

आश्रय या एसएमईएफ च्या प्रवेशिकेचे सर्वाधिक मते मिळून कौतुक झाले आणि पीपल्स चॉइस पुरस्कार  ही मिळाला. “विविध दैनंदिन समस्यांचा सामना करण्याची क्षमता लोकांना मिळावी यासाठी काही सामाजिक दृष्ट्या महत्वाचे उपक्रम संकल्पित करण्याची ब्रिक ची धारणा आहे. यातूनच आमच्या विद्यार्थ्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर काम करून आपली डिझाइन विषयीची जण विकसित करण्यास उत्तेजन मिळते,” 

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. पूर्वा केसकर म्हणाल्या बहुतांश बस स्टॉप एका ठराविक डिझाइन चा वापर करतात आणि हेच डिझाईन सर्व शहरांत वापरले जाते. पुणे हे १०० स्मार्ट सिटी प्रकल्पात समाविष्ट असलेले एक महत्वाचे शहर आहे. आमच्या विद्यार्थ्यांना शहराच्या विविध भागातील गरजांचे स्वरूप आणि व्याप्ती समजली आणि त्यावर त्यांनी लोकसहभागाचे उपायही सुचवले याबद्दल आम्हाला समाधान आहे. आमच्या टीम चा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.”
आर्किटेक निनादराव बेडेकर यांनी बस्तरचे डिझाईन करताना ऊर्जा वापर या तत्वाचा अवलंब केल्याचे स्पष्ट झाले बस स्टॉपच्या छतावरच्या सोलार पॅनल मुळे निर्माण होणा-या उर्जेवर पंप चालतात आणि २४ तास पिण्याचे पाणी लोकांना उपलब्ध होते असे हे आत्मनिर्भर डिझाइन आहे. याच ऊर्जेमुळे बस स्टॉप ची सेन्सर वर आधारित प्रकाशयोजना चालविणा-या बॅटरी चार्ज होतील आणि स्टॉप वर असलेल्या प्रवाशांच्या संख्येनुसार प्रकाश कमीजास्त होईल. याच उर्जेवर क्लोज सर्किट कॅमेरा चालेल आणि त्याने टिपलेली हालचाल कॅमे-याच्या मेमरीत साठविली जाईल. या योजनेमुळे बस स्टॉप आणि त्याचा वापर करणारे प्रवासी या दोघांचीही सुरक्षितता जपली जाईल.”
“असे बस स्टॉप अगदी कमी वेळात उभारता येतील आणि चिंचोळ्या आणि गर्दीच्या रस्त्यांवरही त्यांचा वापर करता येईल हे ध्यानात घेऊन आम्ही त्यांसाठी ४ फूट गुणिले ४ फूट पोकळ प्रीकास्ट पॅनल वापरण्याचे ठरवले. ही पॅनल हलकी असतात आणि पोस्ट टेन्शन केबल चा वापर करून जाग्यावर जोडता येतात,”  आदित्य सावलकर यांनी सांगितले“प्री कास्ट पॅनल ला आय सेक्शन फ्रेमवर्क चा आधार दिला आहे आणि या फ्रेमवर्क मध्ये प्रकाश योजना आणि बस येण्याआधी २ मिनिटे प्रवाशांना सूचना देणारी विजेवर चालणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. बस स्टॉप चा वापर किती प्रवासी करतात त्यानुसार या फ्रेम्स ची संख्या कमीजास्त करता येते आणि त्यानुसार शहराच्या विविध भागातील गरजांनुसार बस स्टॉप ची लांबी कमीजास्त होऊ शकते,”  असे वृषाली रोकडे म्‍हणाल्‍या
सिद्धार्थ कदम म्हणाला, “या स्पर्धेसाठी तयारी करताना आम्हाला आमचे प्राध्यापक आर्किटेक्ट अभंग कांबळे आणि आर्किटेक्ट भाग्यश्री बांदेकर यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. अभंग सर पुण्याचे रहिवासी असल्यामुळे स्थानिक गरजा समजून घेण्यात त्यांचे आम्हाला विशेष साह्य झाले. आमच्या प्रवेशिकेसाठीचा प्रस्ताव पूर्ण करताना दोघांचेही साह्य मिळाले. ”
बस स्टॉप चे डिझाइन बरेचदा टॉप डाऊन  असा विचार करून केले जाते. यामधे मुख्यतः बस स्टॉप भराभर उभारता येणे आणि त्यांचा वापर लगेच सुरू करणे ही भूमिका असते. यातून अशा बस स्टॉप ना एक सरधोपट स्वरूप येते आणि शहराच्या नकाशावर त्यांचे काही खास स्थान उरत नाही. याउलट बॉटम अप पद्धतीने स्थानिक गरजांनुसार तयार केलेले बस स्टॉप स्थानिक लोकांच्या दृष्टीने जास्त उपयुक्त ठरतो.

Leave a Reply

%d bloggers like this: