Mumbai – पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही केलाच नाही – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : मान्सून आज येथे दाखल झाला असून पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूककोंडी झाली आहे.  यामुळे नाळेसफाईचे दावे फोल ठरल्याचे  उघड आहे. यावर बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी “पाणी साचणारच नाही, असा दावा आम्ही केलाच नाही”, असे  म्हटले आहे. तसेच “अंधेरीच्या सबवे, हिंदमाता कायम पाण्याखाली जाणारी ठिकाणंआहेत. सकाळी निश्चित मोठा पाऊस, उंच लाटा यामुळे शहरात पाणी थांबलं होतं, त्याबद्दल शंका नाही. आता  तिथे पाणी नाही पाण्याचा निचरा झाला आहे, असेही  महापौर म्हणाल्या.

मी आढावा घेतलाय १९५ मिली, १३७ मिली पाऊस झालाय. ९५ मिली पाऊस झाल्यास खालून पाणी डायव्हर्ट होत. पण आता बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा झाला आहे. उंच लाटा, त्याचवेळेला मोठा पाऊस, दरवाजे बंद, उलर वॉटर टेबलमधून देखील पाणी बाहेर येत. भरतीच्या वेळेत पाणी साचणार, कारण ते बाहेर सोडता येत नाही. मुंबईत पाणी भरणारच नाही, असा दावा कोणीच केलेला नाही. पूर्वी २ ते ५ दिवस मुंबई ठप्प व्हायची पण आता तसं होत नाही. पुढे बोलताना, निष्काळजी पणा होत असेल तर कारवाही करू. मागच्या वर्षीपासून आपल्याकडे मनुष्यबळ कमी झालं आहे. पण ते कारण सांगून आम्ही पळवाट काढणार नाही. आम्ही पाणी जास्त साचणार नाही याची काळजी घेऊ. विरोधकांना आरोप करायचे आहेत, ते करूद्यात आम्ही उत्तर देत बसणार नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, ते सांगतील ते ही बघून काम करू.

Leave a Reply

%d bloggers like this: