ज्येष्ठ समीक्षक विश्वास वसेकर यांच्या ऋतुबरवा ग्रंथास पुरस्कार जाहीर

पुणेः-मातोश्री स्व.सुर्यकांतादेवी रामचंद्र पोटे ट्रस्टच्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्यीक पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली असून ललित या वर्गवारीतून पुण्यातील ज्येष्ठ समीक्षक लेखक विश्वास वसेकर यांच्या ऋतुबरवा या माहितीपूर्ण ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीपळ आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे.मातोश्री स्व.सुर्यकांतादेवी रामचंद्र पोटे ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र पोटे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.

या पुरस्कारांसाठी परीक्षकांनी परीक्षण करुन पुरस्कार समितीच्या सभेत या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केला.समितीच्या संयोजिका डाॅ. शोभा रोकडे तसेच समिती सदस्य डाॅ.कुमार बोबडे, डाॅ.पंकज वानखेडे, आर.एस.तायडे, डाॅ. मंदा नांदूरकर, अॅड. प्राजक्ता राऊत, वृषाली वानखेडे आदी मान्यवरांनी पुरस्कार निवडी मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

माजी राज्यमंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ या ट्रस्टची स्थापना केली आहे.ह्या ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षी मराठी साहित्यातील विविध लेखन प्रकारासाठी महाराष्ट्रातील साहित्यीकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

Leave a Reply

%d bloggers like this: