महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज चितळीकर

पुणे : महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज मनोज शरदचंद्र चितळीकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी श्रीपाद बेदरकर, सचिवपदी ज्ञानेश्वर नरवडे, सहसचिवपदी अमोल शहा आणि खजिनदारपदी अनुरुद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या संघटनेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२१-२२ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे, बी. एम. शर्मा, विलास आहेरकर आदी उपस्थित होते.

सभेचे आयोजन झूम प्लॅटफॉर्म वरून करण्यात आले. या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघटनेचे ‘महाराष्ट्र कर सल्लागार संघटना’ असे नामकरण करण्यात आले. तसेच संघटनेचे कार्यक्षेत्र संपुर्ण महाराष्ट्र असेल, असा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. यापूर्वी संघटनेचे नाव पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार संघटना असे नाव होते.

Leave a Reply

%d bloggers like this: