कोव्हिडची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यात सरकारी रुग्णालयांची महत्वाची भूमिका – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि.८ : कोव्हिडची दुसरी लाट नियंत्रणात येवून काही प्रमाणात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.यात प्रशासना बरोबरच सरकारी रुग्णालयांचा मोठा वाटा आहे.त्यांना आता पुढची लाट थोपविण्यासाठी साधन सामुग्रीची जुळवाजुळव होत आहे.त्यांनी या कलावधीत रोल मॉडेल तयार केले आहे.”असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी केले.

या पूर्वी डॉ.गोऱ्हे यांनी ससून रुग्णालयास २५ लाख रुपयांचे एन आय सी यु व्हेंटिलेटरस आमदार निधीतून दिली होती. यांनंतर दि.०६ जून, २०२१ रोजी ऑक्सफाम च्या वतीने मेडिकल साहित्य ना.डॉ गोऱ्हे यांच्या हस्ते ससून रुग्णालयसास प्रदान करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी देण्यात आलेल्या साहित्यात- ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स, ४० लिटरचे सिलिंडर,ऑक्सिजन नोजल मास्क,बेड्स व अन्य साहित्याचा समावेश होता. या प्रसंगी अधिष्ठाता (डिन) डॉ.मुरलीधर तांबे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे,ऑक्सफाम कंपनीचे परमेश्वर पाटील,आनंद पेडगावकर,निखिल वाघ,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे,गजानन थरकुडे,उपशहर प्रमुख आनंद गोयल,शहर संघटक गजानन पंडित,युवा सेना उपजिल्हा अधिकारी शादब मुलाणी,युवसेना अधिकारी सनी गवते,विभाग प्रमुख राहुल जेकटे आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: