नाना पटोले यांना रोखण्यास भाजपला राणेंना पुढे करण्याची वेळ – गोपाळदादा तिवारी

पुणे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नियुक्तीने भाजपची चिंता वाढली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला दम भरण्याचे काम भाजपने नारायण राणेंवर सोपविल्याचे दिसते. असे उद्गार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी आज येथे काढले.

बंगाल व इतर राज्यांच्या निवडणुका संपल्यावर, मोदी -शहाची  वक्र -दृष्टी महाराष्ट्राकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे. संविधानात्मक मार्गाने भूमिका निभावण्यास राज्यातील विरोधी पक्ष
हतबल ठरत असून, भाजप आता गुन्हे – प्रणित दमबाजी करण्यावर उतरले असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच नारायण राणे मोदींवर टीका केल्यास वाजवून टाकीन? मोदी वर टीका करण्याची नाना पटोले यांची लायकी काय आहे? अशी भाषा पुणे शहरात पत्रकार परिषद घेऊन करायला लागलेत. असे गोपाळदादा तिवारी यांनी नाना पटोले याच्या वाढदिवसाच्या ओचीत्याने आयोजित कार्यक्रमात भाषण करताना काढले. संतांची परंपरा असलेल्या शिवछत्रपतींचा व शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात लोकशाही विरोध. असंवैधानिक हातखंडे वापरण्याचे भाजप सफल होणार नाही हे देखील लक्षात घ्यावे असा सल्ला भाजपचे नेत्यांनी आपल्या शीर्षनेतृत्वाला द्यावा असे आवाहन गोपाळदादा तिवारींनी केले.

महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्याने रिक्षाचालक व मजदूर- यांना मास्क ,सॅनिटाइजर ,हॅन्डग्लोज , विटामिन गोळ्या आदींचे वाटप काँग्रेस नेते व राज्याचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, असंघटित कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेविका वैशाली मराठे, राजाभाऊ मराठे, कोथरूड काँग्रेस अध्यक्ष विजय खळदकर, संदीप मोकाटे ,घनश्याम निम्हण, महेश विचारे ,प्रा सुनील मोरे, विश्वास खवले ,अरुण नाईकनवरे, निलेश वाघमारे, विजय मोहोळ ,गुफुर शेख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संघटनेचे समन्वयक व शहर काँग्रेस सरचिटणीस किशोर मारणे व त्यांचे सहकारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम आगा यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: